Thursday 17 December 2015

Juvenile.... Yes, he was the one, then.....



Ohh , why do they react so much? It was just a bad day... 

He did not commit crime ... it just happened ... after all he was just a Juvenile .... 
Moreover ...it was her crime ... has always been hers..... being a girl is a big crime in itself,isn't it!!! and she was a professional ... Ahh! ...that's evil in fact.... don't they understand this?.... and he ... he was just a juvenile.... 

she was wearing ethnic suit and she was looking stunning.... cherry on the top ... she was travelling at late hours.... She thought that she is safe in public vehicle.... how stupid of her.... she needed punishment for such a foolishness ...isn't it? and this juvenile just made sure that she was punished enough.... 

He thought she was just another "thing" to be used... so what ...he was just a juvenile....
She tried to be reluctant and she tried to honor herself.... how dare she? She should have surrendered and he would have raped her and left her alive .... He was a juvenile after all....
But no, she rebelled , she tried to save herself.... she tried to oppose.... Such a bad lady she was.... she fought for her existence ... and then, he left with no other option .... she had to be punished....

So this loving juvenile made sure that she was stripped ... and she was beaten after she was raped.... he made sure that every ounce of her uterus and every drop of her blood came out of her body .... and she was made to pay the cost of being what she was.... she was left thrown to suffer... her only supporter was also beaten for he tried to help her..... but you know, nobody should curse him.... he was just a juvenile and did not know any other way to punish them ......

But then demography out here is bad.... they made the system put him behind the bars.... how could they.... he was just a juvenile.... but now see, by god's(or system's?) grace... he would be set free soon... he would be helped by our system for his better and serene future.... and may be he would now punish some other girl for her crime of being a girl ....  

They should be thankful and grateful to the system which sets him free ....why do they react so much..... after all he was just a juvenile then....

No ... don't try to relate it to any ONE incidence.... it has been happening here for years together ....and I need help to understand something.....

 I am a little confused as to what did I learn for so many years.... My vocabulary is too bad I discovered..... I never knew that "juvenility" and "lesions" are synonyms .... I never knew that morbidity is part and parcel of "not being a grown up and adult by law" ..... 

Coz .. you know ... I can't call myself descendant of people like Shivaji maharaj and Maharana Pratap.... who were ready to die in the name of Honor of every citizen and a criminal was a bloody criminal for them.... age, gender, caste .... no bar..... 

Will somebody help me and lemme know ... whom to call JUVENILE..... and what kind of acts are not considered to be crime if done by this loving juvenile ?????????????


 


Thursday 23 April 2015

धन्यवाद व.पु.


"अस्वस्थता त्रास देतेच... पण त्या अस्वस्थतेचं कारण माहित नसेल तर, आणखी तगमग.... " (हे देखील व.पुं.चीच प्रतिभा... मला फक्त पटलेली)

आज हे का आठवावं... तर मन अस्वस्थ होतं म्हणून... आणि सुदैवानं कारण ही माहित होतं म्हणून नव्यानं व.पु. मय ... पुन्हा एकदा....
आणि अस्वस्थ कशामुळे हे मन नावाचं माकड.... तर लिहिता येत नाही म्हणून....म्हणजे जितकं मनात येतं ते सगळं लिहिता येत नाही म्हणून....

किती आहे खरं तर कागदावर उतरावं असं.... आकाशाची व्याप्ती असलेली माणसं... आपल्या माणसासारखा मिठीत घेणारा पाऊस.... पावसासारखा निरामय करणारा समुद्र.... कुणाचे तरी समुद्राइतके अथांग डोळे.... एखादं डोळ्यांपेक्षा बोलकं मौन.... एखादं मौनपेक्षा असीम मन... मनावर गारुड करणारी एखादी संध्याकाळ.... आणि तिच्यापेक्षा सावळा कृष्ण....
पापणी लवेतो लक्ष लक्ष गोष्टी खुणावून जातात.... कागद मात्र चांगदेवाच्या पत्रासारखा... कोराच्...

खरंच् मनापासून लिहावसं वाटतंय आणि काही म्हणता काही लिहिलं जाऊ नये असा हातानं आणि वृत्तीनं पुकारलेला संप.... आणि मग मन बिचारं सगळे पूर , सगळी वादळं सोसत रहातं .... अखंड... मग अर्धे राहिलेले लेख …. न लिहिलेलं एखादं पत्र … कवितेची दीड ओळ …. सगळं आवर्तनं आतल्या आत ….
म्हणून मग अस्वस्थता....

आता ह्यात व. पुं. चा संबंध तो काय.... तर अशा कित्येक अस्वस्थ क्षणांमधून, दोस्त होऊन ,आजवर त्यांनी मुक्त केलं असेल किती जिवांना.... अशावेळी कदाचित व.पु. "टेंपरवारी" कृष्ण होतात...friend ,philosopher, guide and what not.... असंच "रंगपंचमी"च्या रूपानं अलगद "पाय माझा मोकळा" करत त्यांनी आज हा "गुंता" सोडवला....
व.पु. म्हणतात," श्वासोच्छवासा बद्दल लिहा असं कुणी मला सांगितलं तर काय लिहिणार.... ३ च शब्द... ’श्वासोच्छवास होत रहावा’ .... रक्ताचा आणि आयुष्याचा अपरिहार्य आणि सुरेख भाग असणाऱ्या गोष्टींबद्दल इतकंच् लिहिता येतं"



आता मन पाऊस सोसताना पाऊस होईल आणि समुद्राच्या आठवागणिक गाज ....
मौनाबरोबर संवाद होईल अलवार आणि सावळ्या डोळ्यांमधलं दिसेल मोरपीस विनासायास....
फोटो सुरेख खरा पण फोटो काढण्याच्या अट्टाहासापोटी खरोखरचे दृष्य अनुभवायला आणि जगायला विसरायला लावणाऱ्या गुंत्यातून सोडवणाऱ्या या कृष्णरूपाबद्दल तरी काय बोलणार ... इथे ही ३ च शब्द...... "धन्यवाद व. पु."


Friday 6 March 2015

ब्रेकिंग न्यूज

बरेच दिवस गाजत असलेल्या "ब्रेकिंग न्यूज"वर शेवटी आज पडदा पडला... इतके दिवस ताणल्या गेलेल्या भुवयांनाही .... "काय तरी बाई ऐकावं ते नवलच्... हल्ली कुणाचं काई सांगता येत नाही ... डोंगर पोखरून उंदीरच हो पंत.... " या आणि तत्सम् प्रतिक्रियांनंतर जरा आराम मिळाला..... आणि तिचं काय झालं ... ते काही का होईना... पण महिना १५ दिवस श्टोरी मात्र बेस मिळाली हे तेवढं खरं... तंबाखू , बिडी च्या आवर्तनांपेक्षाही अंमळ जास्तच झाली म्हणायची दिवसागणिक घरी-दारी चर्चा....

तिच्यासाठी मात्र हे सगळं सुरु झालं त्याला काही महिने झाले, ३-४ कदाचित्...घर, संसार, नोकरी, मिळकत, नाती-गोती सगळं अगदी आलबेल असतानाही अचानक तिला वाटलं की आतून, खोल काहीतरी घडलंय.... की बिघडलंय.... ते कळायला वेळ होता अजून पण काहीतरी बदलत होतं हे नक्की. स्वत:शी सतत संवाद असलेल्या तिनं पुरेसा वेळही दिलाच् स्वत:ला सगळ्या शक्यता चाचपडायला, पण जे चक्र आत फिरत होतं ते काही थांबेना. बुद्धी , मन , आत्मा यांचं वेगळं अस्तित्व न जाणवण्याइतपत् एकरूपतेची भावना... मेंदू मधे काहीतरी सतत फिरतंय आणि मोठं मोठं होत जातंय असं काहीसं...ते काहीसं, शरीर झोपलं तरी जागृतच्...अन्नपाण्याचंही भान राहू नये आणि तरी सतत कुठूनतरी शक्ती मिळत रहावी अशी अवस्था...एखादी बॅटरी चार्जिंगला लावावी, आणि तशीच विसरून जावी... मग ती चार्ज व्हावी.. मग ओव्हरचार्ज,मग गरम आणि कालांतराने तिचा स्फोट व्हावा अशीच शक्ती आपल्याही अस्तित्वात जाणवतेय असं काहीसं तिला वाटत होतं... सतत... १५ दिवस.... हो अगदी हल्ली काय म्हणतात तसं...२४*७...सुदैवानं किंवा दुर्दैवानं ती सोडून कुणालाच् यातल्या कशाकशाचा पत्ता नव्हता, मात्र तिच्यासाठी सगळं पेलण्यापलीकडे चाललं होतं म्हणून तिने तिच्या मानसोपचार तज्ञ असलेल्या तिच्या भाषेत... "मनातल्या अळ्या साफ करणाऱ्या" डॉक्टर मित्राला हाक दिली. हो म्हणजे, मानसोपचार तज्ञाची मदत घेणं म्हणजे लाजिरवाणं किंवा वेड लागल्याचं लक्षण असं मानणाऱ्या "शहाण्यां"मधे ती मोडत नाही... :) वरकरणी मानसिकच वाटलेल्या या अवस्थेचं ४ सलग सेशन्स् मधेही निदान होईना म्हटल्यावर तिच्या मित्राने तिला काही आवश्यक रक्त चाचण्या करण्याचा सल्ला दिला. दुसऱ्या दिवशी चाचण्या झाल्या, दोनच् दिवसात तिच्या तब्येतीचं भविष्य ठरवणारा तो कागदाचा तुकडा डॉक्टरांच्या हाती आला आणि इथून खरी ब्रेकिंग न्यूज चं बीज अंकुरायला सुरुवात झाली...  
रिपोर्ट आले आणि एका मोठ्या होस्पिटलमधलं वातावरण ढवळून निघालं. आजतागायत कधीही न बघितलेली गोष्ट सगळे डॉक्टर बघत होते. गेल्या शेकडो वर्षांच्या वैद्यकीय नोंदी तपासून झाल्या तरी काही म्हणता काही कळेना. शेवटी हा रिपोर्ट जगभरातल्या नामी वैद्य, डॉक्टर, रिसर्च एक्स्पर्टस् अशा सर्वांनाच पाठवण्यात आला आणि लवकरात लवकर काही उपाय कळवावा अशी विनंतीपर पत्रही गेली.पैसा आणि प्रसिद्धी यापेक्षाही आजवरच्या ज्ञानाला मिळालेलं आव्हान म्हणून जगभरातले मेंदू त्या एका कागदाच्या तुकड्याकडे बघू लागले. आणि त्रिखंडामधल्या "मिडिया"नामक राक्षसीची भूक भागवणारी "ब्रेकिंग न्यूज" झळकली... काय असेल तिच्या रक्तात.... आजतागायत् कधीही न दिसलेल्या या घटकाचं नाव तरी काय... काय म्हणतात डॉक्टर!!! " वगैरे वगैरे वगैरे....

हो, आजवर कधीही न आढळलेला असा अनामिक घटक तिच्या रक्तात दिसला होता. आणि गेला महिना दीड महिना तिची स्वत:शीच् चाललेली झुंज स्वत:शी नसून या अनामिक घटकाशी आहे हे नव्यानं तिला जाणवलं... ज्याला नाव नाही, गाव नाही, रूप नाही,आकार नाही, उगम नाही , अंत असेल की नाही माहीत नाही... अशा अज्ञाताशी तिची आणि तमाम वैद्यकीय शास्त्राची लढत होती. ४ दिवसाच्या अथक अभ्यासांतीही जेव्हा काहीच निष्पन्न होईना तेव्हा एक शेवटचा उपाय म्हणून डॉक्टरांनी संपूर्ण रक्त बदलण्याचा निर्णय घेतला... "डायलिसिस्" ची तयारी झाली... इकडे "मिडिया" नावाच्या त्या सुकुमार दिसणाऱ्या मायावीनी ने तिच्यासाठी शुभेच्छांचे  SMS  मग ती जगेल की नाही यावरची Votes  यावर आपली क्षुधा शमवायला सुरुवात केलीच होती.
टप्प्याटप्प्यानं सगळं रक्त बदललं गेलं, थेंबन थेंब नवीन असलेलं तरीही थकून गेलेलं ते शरीर परत एकदा रक्ततपासणीसाठी सिद्ध झालं. दोनच दिवसात परत एकदा आणखी एक कागदाचा तुकडा जगासमोर आला आणि "ब्रेकिंग न्यूज" आता "निराशाजनक बातमी" म्हणून झळकली. डबल फिल्टर्ड, ट्रिपल फिल्टर्ड वगैरे तेल आणावं आणि तरी किटली उघडल्यावर कुजकाच वास यावा तसा तो घटक अख्खं रक्त बदललं तरी तिथेच ठाण मांडून बसून राहिला होता...
दिवसागणिक एकिकडे मनातला थकवा आणि निराशा वाढत होती तर दुसरीकडे  मसालेदार बातम्यांचं भरीत प्रेक्षकांच्या, वाचकांच्या नि श्रोत्यांच्या सेवेसाठी तयार होत होतं.आणखी एक प्रयत्न म्हणून परत एकदा रक्त बदलावं की काय असा विचार चालू असतानाच, तिच्या नावे एक निनावी पत्र आलं. पत्र तसं खाजगी खरं पण तिच्या अस्तित्वावर रंगलेल्या चर्चेइतकंच सार्वजनिक ते क्षणाचीही उसंत न घेता झालं.पत्र अगदी नेमकं .....

"बाळ, तुला जे झालंय त्याचा उपाय कोणत्याच वैद्याकडे तुला मिळायचा नाही. जो घटक आज तुझ्या रक्तात दिसतोय तो माझ्या रक्तात दिसला त्याला काही वर्षं लोटली. हा घटक मानवी रक्तात असतोच, फक्त मजा अशी आहे की वटवाघळांचा आवाज जसा कानाच्या पडद्यावर आपटूनही आपण ऐकू शकत नाही तसंच या घटकाचं अस्तित्वं...इतकं दीर्घ की आपल्याला सहसा ते जाणवत नाही...  एक विषाणू आहे तो जर चुकून शरीरात भिनला तर मात्र हे दीर्घ असणं विरायला लागतं ...आणि मग तो रक्तात असा दिसून यायला लागतो. हा विषाणू भारतीय उपखंडात पाचएकशे वर्षापूर्वी खूप होता...आता सापडत नाही फारसा; पण तू आणि मी त्याला आकर्षित करणारे लाखांतले एखादे... या विषाणूचं नाव प्रत्येकासाठी वेगळं ... मुक्ताईला भिडला विट्टल म्हणून आणि मीरेला ग्रासलं कृष्ण होऊन... मला ज्या नावानं ग्रासलं ते सांगितलं तर तुझ्याभोवती फिरणारे सगळे "कॅमेरे" माझ्याभोवती घिरट्या घालतील , फ़क्त म्हणून त्याचा उल्लेख टाळतो.. तर असा हा विषाणू... आणि जो घटक तुला दिसतोय, त्याचं नाव "अहं" किंवा "मी" पणा....तुझ्यातला "मी" ह्रस्व झालाय पोरी... तुझ्यातला "मी" आता "मि" झालाय.... याला संपवण्याचा उपाय एकच, तुला ग्रासलेल्या विषाणूचं नाव लवकरात लवकर शोध. एकदा का त्याला शोधलं आणि त्याला बिनशर्त शरण गेलं की हा उरलासुरला "मि" त्यात विरघळून जाईल... तुला परत तुझं शरीर होतं तसं मिळेल... किंबहुना याही पेक्षा कित्येक पटीनं उत्कृष्ट.... तुही, तुझं अस्तित्वंही.... तेवढं नाव मात्र लवकर दे त्या तुझ्या विषाणूला... नाहीतर नाहक मरशील... शुभम!!!"

कालच हे पत्र सगळ्या जगाला ऐकायला मिळालं... कुणाच्या तरी वेदनेवर उपाय मिळण्याची शक्यता निर्माण झाली म्हणल्यावर त्यात काही मसालेदार उरलं नाही... तिचा शोध पूर्ण होईल किंवा नाही.. ती बरी होईल किंवा होणार नाही...द्यायची आहे कुणाला तिची साथ... तर आता चघळून बेचव झालेलं हे च्युविंगम... तसंही इतके दिवसात राजकारण, बलात्कार,खून, भ्रष्टाचार, त्यावरचे कायदे, पेज ३ वरची गोसिप्स या सगळ्या सगळ्यांमधल्या कित्ती तरी गोष्टी आसुसल्या आहेतच "ब्रेकिंग न्यूज" चं बिरूद मिरवायला... तिचं काय होईल....ते काही का होईना...पण महिना १५ दिवस श्टोरी मात्र बेस मिळाली हे तेवढं खरं...नव्यानं उंचावल्या जाण्यासाठी...इतके दिवस ताणल्या गेलेल्या भुवयांना जरा आराम मिळाला.....बरेच दिवस गाजत असलेल्या "ब्रेकिंग न्यूज"वर शेवटी आज पडदा पडला...

image courtesy : Internet

Wednesday 13 August 2014

तो ना …. श्या….

"मा… ज …. डोक्यात हवा गेलीये त्याच्या … स्वतःला फार शहाणा समजतो… email, whatsapp, facebook...त्याचे पोस्ट  आम्ही वाचायचे… पण तो ढुंकून नाई reply करत …. तो न फार वरणभात आहे यार…. हिचं सगळं फार च भडक असतं …. तिचं अमक्या ढमक्या बरोबर लफडं आहे माहिते का … त्याचा divorce झाला म्हणे … यांच काही कळत नाही …. सगळे कलाकार इकडून तिकडून सारखेच …."

किती सहज, comments किंबहुना judgments pass करतो नाई आपण ! कलाकार मग तो कुठल्याही क्षेत्रातला असो, एका विशिष्ट उंचीवर पोचला की हे सगळं किंवा याहीपेक्षा जास्त त्याच्या बाबतीत सहज बोलून जातात लोक…. मुळात त्या कलेबद्दल आपली योग्यता काय ,आपण त्या कलाकाराला किती ओळखतो, आपण पैसे मोजून ,किंवा अगदी फुकट तरी त्या कलाकाराची कला जाणून घ्यायचा प्रयत्न तरी केला आहे किंवा नाही….
याचा तर नाहीच पण त्या व्यक्तीचा किमान माणूस म्हणून तरी विचार करतो का आपण ?

कलाकार तर आहेच की , पण फक्त त्याची कला म्हणजे तर तो माणूस नव्हे…. त्या कलेशिवाय असतीलच की त्याच्याही व्यक्तिमत्वाचे पैलू … कदाचित गर्दीला सहज सामोरा जाणारा तो… एकट्या माणसाशी नसेल बोलू शकत फ़ार… आपण १००० लोकांसमोर बोलू शकतो का त्याच्यासारखं … "अरे हसत पण नाही दिसला रस्त्यात तर " …. नसेल हसत… आपण किती अनोळखी चेहऱ्यांना आजवर असा smile दिलय …. उलट असं कुणी अनोळखी हसलं तर त्याच माणसाला वेडसर ठरवून मोकळे झालो असू कित्येकदा …. असतील कदाचित त्याच्याही डोक्यात त्याचे, तुम्हाला माहित नसलेले, विचार …. कदाचित एखादी विवंचना असेल…त्याच्याही घरात असू शकतील छोट्या मोठ्या कुरबुरी ….तुमच्यासारखे आणखी हजारो लोक रोज पत्र, फोन करून भंडावत असतील  …  कदाचित काहीच निर्माण होत नसेल त्याच्या हातून नवं … किंवा खूप काही उमटत असेल आतल्या आत… त्याची अस्वस्थता असेल… कुणाचे तरी शब्द भिरभिरत  असतील डोक्यात  किंवा नसेल काहीच … असेल स्वतःच्या धुंदीत … राहू दे की … तुम्ही नसताच का कधी असे हरवलेले …

office मध्ये document keeping ची साधी पद्धत बदलली तर साहेबाला शिव्या घालणारे आपण … किती अधिकाराने त्याच्या एकसुरी निर्मितीची तक्रार करतो…. आवडतं एखाद्याला नुसतं सूर्यास्त रेखाटण … किंवा आवडत असेल एखाद्या संगीतकाराला "यमन" सगळ्यात जास्त ….एखाद्याला ढोलाशिवाय नसेल आवडत गाणं…. आणि एखाद्याला आवडत असतील फक्त मंद आलाप …. म्हणून लगेच तो वरणभात तरी किंवा फक्त तांबडा रस्सा तरी …. तुमच्या कामात रोज फुलतंय का इंद्रधनुष्य … त्याच्या कार्यक्रमांना downmarket म्हणा … जरूर … पण त्या आधी … त्याने १०० केले असतील …तुम्ही १० कार्यक्रम तरी  houseful करून दाखवा …

"नुसता पैश्याच्या मागे असतो … फायद्याशिवाय बोलत नाही अजिबात !" त्याच्याही घरात तुम्हाला लागतं तेवढंच धान्य , भाजीपाला , दूध ,सुखसोयी लागतातच ,  कलेतून आनंद देतो समाजाला … म्हणून त्याला घरपट्टी , विजेचं बिल , मुलांचं शिक्षण हे फुकट मिळत नाही … (कलाकार, अशी जात, अजून तरी आरक्षणाच्या यादीमध्ये दिसत नाही कुठल्याच फोर्मवर )…. आणि कुणी सांगावं याशिवाय कौतुकाबरोबरच  मानधन ही बुडवणारे , भेटले असतील नग त्याला …. त्याचं वार्षिक  appraisal करणारा साहेबही नसेल आणि कुणी ….

"त्याने सोडलं म्हणे बायकोला …. तिची लफडी आहेत म्हणे फार " … अरे कोण म्हणे …. तुका म्हणे कि नामा म्हणे … म्हणून इतकं महत्व त्याला ?  आणि मुळात … दरवाजा न वाजवता वडील खोलीत आले तरी चिडणारे आपण … आणि मित्रांचे मेसेज आईने वाचू नयेत म्हणून प्रत्येक app ला password चिकटवणारे आपण …. कुणीतरी फक्त प्रसिद्ध आहे किंवा तुम्ही त्याचे तथाकथित सर्वात भारी चाहते आहात म्हणून किती डोकावणार त्याच्या आयुष्यात ….

मुळात त्याने त्याच्या कलेतून खूप आनंद दिला आहे म्हणून तर आपल्याला त्याच्याशी बोलावं , भेटावं वाटतंय ना … तुम्ही कधीही न मागता त्याने  तो पैशात न मोजता येणारा विरंगुळा तुमच्या स्वाधीन केलाय ना …. तुमचे मूड्स सांभाळत वाहतंय न त्याचं गाणं , संगीत, शब्द किंवा चित्र … आणि तुम्हाला काय द्यायचंय परत …. कदाचित काहीच नाही … अगदी कौतुक सुद्धा न मिळता तो करतोच आहे श्रद्धेने सगळं … त्याचा चालूच आहे प्रवास … आणि तुम्ही बरोबर असा वा नसा … तो त्याच्या निर्मितीचं फुल पाडणारच आहे तुमच्या पदरात…

मग चांगलं नाही तर  बिनबुडाच्या प्रतिक्रियाही नकोच ना द्यायला …. पुढच्या वेळी कुणाबरोबरही , कुणाबद्दलही चर्चा करताना …. वाईट बोलताना…. त्याचा कलाकार म्हणून न करता …. आपल्यासारखाच एक माणूस म्हणून विचार करुया का …. आपल्या एका प्रतिक्रियेने त्याचं पत्त्याच घर कोसळू शकेल …. याची घेऊया का दखल …. नाहीतर आहेच तो ही आणि आपण ही इथेच …. comments पण आहेतच आपल्या हक्काच्या …सोपं आहेच की म्हणणं … "तो न … श्या …"






Thursday 17 July 2014

तहानेलं पाणी...

     आटपाट नगर होतं... तिथं रहायचं पाणी... हो खरंच... अगदी नानांनी म्हणलेल्या कवितेमधलंच पाणी..."आसमान से आनेवाली ,बुन्दोमे गानेवाली बारिश होऊन ,पहाडोसे फ़िसलनेवाला,नदियोंमे चलने वाला,नहरोंमें मचलनेवाला प्रवाह होऊन... कुंवेपोखर से मिलनेवाली ,खपरेलोंपर गिरनेवाली, गलियोंसे गुजरनेवाली सर होऊन.... " कित्ती कित्ती आनंद द्यायचं पाणी.. आणि स्वत:सुद्धा अगदी खळखळून हसायचं,खुशीत बागडायचं पाणी... अवघ्या नगराचं इतकं लाडकं की जीव की प्राण होतं साऱ्यांचं पाणी.

पण निर्मोही वाटायचं ते... का कुणास ठाऊक पण त्याचा जीव कुठे अडकला असेल असं वाटायचंच नाही...जणू कृष्णचंच रूप दुसरं... सगळ्यांसोबत असूनही कशाकशात न अडकणारं... सगळ्यांना वेड लावून स्वत: नामानिराळं होणारं...  अशी कित्येक वर्षं सरली...

     आणि खरंच त्याने अगदी दाखवूनच दिलं निर्मोहीपण त्याचं... सगळ्या नगराचा एवढा जीव पाण्यावर पण हे हरवलं ते हरवलंच...कुठे कुठे म्हणून नाही शोधलं त्याला अगदी सरकारी कचेरीत तक्रारही केली... पण कुठे दडी मारलीन् देव जाणे यानी...नगराला अगदी सुतक लागलं जणू... चैतन्य उरलंच नाही अगदी... सगळ्यांच्या डोळ्यातले पूरही आटले तरी पत्ता नाही तो नाहीच याचा... किती काळ लोटला कुणास ठाऊक ... नगर आजही वाट पहातंच होत... आणि अचानक....

     बातमी येऊन थडकली...नगरापासून १०० मैलांवरच्या समुद्रातून अचानक त्सुनामी नाव धारण करून बाहेर आलं ते... सगळा किनारा ध्वस्त करून परत निघून गेलं.... दोनच दिवसात नवी खबर.... "हाय टाईड" असं विलायती नाव घेऊन आणखी एक किनारा गिळून गेलं पाणी... मग थोड्याच दिवसात.... महापूर बनून...मग ढगफुटी होऊन... सतत नवी पाशवी रूपं घेत छळत रहायलं पाणी...

आणि इकडे नगरातल्या लोकांना काही म्हणता काही उमजत नव्हतं... असं का बदललं पाणी... आनंदाचे झरे होऊन सुखावणारं आपलं पाणी दु:खाचे लोट बनून कसं वहायला लागलं... याच नगरात एक मुलगी रहायची...मॅडी... तिचं या पाण्यावर अपार प्रेम होतं ... तिच्या मनाची एक खोली खास पाण्यासाठी राखीव होती... तिथे कुण्णाकुणाला म्हणून प्रवेश नव्हता... हे सगळं ऐकून तिच्या काळजाचंही पाणी झालं... ती रागावली होती की दु:खी होती कुणास ठाऊक... पण पाण्याच्या परतण्याची वाट मात्र नक्की बघत होती....

मग एक दिवस शेवटी ते दबलेल्या पायाने आलंच नगरात परत... मॅडीला वेशीवरच पाहून थोडं चक्रावलं पण काहीच क्षण... मग दोघांनी घट्ट मिठी मारली... मग काय झालं देव जाणे... मॅडी उसळून बरसलीच... "असलं कसलं जीवघेणं वागणं तुझं? इथे लोक तुझी वाट पाहून शिणले... आणि तू गावंच्या गावं गिळत बसलास... कसली तहान लागली तुला एवढी की जगाचा जीव घेऊनच शांत व्हावी... मैतर ना तू आमचा... आमच्याच भाऊबंदांच्या जीवावर ऊठलास... आमची तहान पाण्याची... तुझी रक्ताची कशी झाली ? दोस्त तरी कसं म्हणायचं रे तुला? ही अशी तहान आली कुठून तुझ्या काळजात राजा? अर्थात तुला काय कळायची नाती गोती आणि माया..."

पाण्यानं सगळं ऐकून घेतलं आणि थंड आवाजात उत्तरलं ," तुझ्या भाऊबंदांचा जीव गेला तर जन्माची मैत्री विसरलीस? लगेच तुझ्या-माझ्याचा हिशोब घेऊन बसलीस... मी नव्हतोच का कधी तुमचा... तुमच्यासाठी जगलोच नाही का कधी...पण तुम्हाला माझी खरंच काळजी होती कधी? माझी जीवाभावाची जंगलं जाळत राहिलात तेव्हा कुठे गेलं प्रेम? माझी घरं बुजवत राहिलात... कधी नद्यांमधे गाळ सोडून ... कधी समुद्रात सिमेंटच्या राशीच्या राशी ऒतून ... कुठे कुठे म्हणून खणत राहिलात... डोंगरच्या डोंगर पठार होत गेले तरी मी शांतच राहिलो...आज कळेल उद्या कळेल म्हणून तुमच्या लक्ष देण्याची वाट बघत राहिलो... आम्ही सगळे सगळे तुमचेच होतो गं, तुमचेच आहोत... पण आहोत तर सगळे आहोत... नाहीतर ... झाडं , चांदणं,वारा,मी, ... कोण कुणाला विसरलं लाडके?... आम्हाला हवेच आहात तुम्ही... तुम्ही धावत सुटलात... आमची अस्तित्वं संपवणारे लुटारू होत गेलात... तुमची अजस्त्र झाली भूक आणि माझं घर मिळत नाही म्हणून कुठे कुठे भटकलो मी... किनाऱ्यांवर,रस्त्यांवर... तर माझी तहान पाशवी वाटायला लागली? तसा आलोच आहे मी परत नगराच्या प्रेमाखातर... माझं तेवढं घर परत शोधायला मदत करशील तर वेळच यायची नाही कुठे जायची.... बघ जमतंय का? "

पाणी आलंच नगरात परत.... पण मॅडी अजूनही वेशीवरच आहे... मिठीत आलेलं पाणी डोळ्यात साठवून... कुणास ठाऊक...परत इतकी गाढ मिठी मिळेल न मिळेल.....

image courtesy : Internet.




Sunday 22 June 2014

देव शोधुनिया पाही … देव सर्वाभूतांठायी ….

विट्ठल नामाचा गजर … डोळ्यात भक्ती … पायात आलेली अमानवी शक्ती …. मला जाम अप्रूप आहे या वारकर्यांच … आणि मला हे कधी जमणारच नाही असा न्यूनगंड पण … दर वर्षी वारी येते दर वर्षी हे विचार सुद्धा … पण त्या सावळ्या विठुरायाच रूप मात्र सतत खुणावत राहतं … याची देही याची डोळा भेट व्हावी म्हणून त्याचीच करुणा भाकायची …. कायमचाचं खेळ हा… 
आणि ते रूप इतकं सहज दिसेल हे कुठे ठाऊक होतं मला… एक कोवळं हसू … एक उबदार मिठी …. डोक्यावर हात ठेवला की वाटावं कि त्या सम:चरणांना स्पर्श झाला… असं त्याचं सर्वांग सुंदर दर्शन… आणि ते ही कुठे … झोपडपट्टीमध्ये ????
हो ...






 तो तिथेही भेट्तो…. तो खरतर कुठेही भेटतो … मला तिथे भेटला … नवीन दप्तर मिळाल्यावर चमचमत्या डोळ्यात … गाणं म्हणून दाखवल्यावर फुललेल्या चेहऱ्यात … शनिवारी परत येते म्हणल्यावर खुललेल्या त्या निरागस हसण्यात …. मी खूप शिकणार ताई असा म्हणत मारलेल्या त्या कोवळ्या मिठीत … सगळी कडे माझा पांडुरंग च तर आहे… 
देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई …. असं संत म्हणाले खरं … पण ती पुण्याई उभं करणं इतकं सहज असेल असं विट्ठलाची ही रूपं पाहीपर्यंत जाणवलंच नाही कधी 


माझी वारी …. दर आठवड्याची … माझा श्रीरंग तिथे त्या वस्तीत भेटतो मला… लोक त्याला School Kit distribution म्हणोत किंवा सेवा सहयोग चा समुत्कर्ष प्रकल्प …. 
माझी मात्र ती वारीच …. विठू माउलीचं सावळं दर्शन घडवणारी … जगायला उमेद देणारी … सुखाचे ते सुख … त्या पावलांच इथेच रूप साकारणारी …. माझी वारी …

Tuesday 27 May 2014

The Show on Screen…. Educate! Encourage! Enlighten!


And yes… the film with 350+ Heroes releases … The volunteers coming to school kit assembly drive…
    The artist many times enjoy more behind the scenes… but the pleasure is beyond words when viewers and audience declare it “their” movie… it’s a reward for the artist… We, the people behind the scene, experience the same pride and happiness when volunteers make the drive theirs.
Every Sunday is more than awaited thing… Every year, the drive makes me more enriched than ever. 9.30am on Sunday seems to be a lazy hour but in the month of May, it’s full of zest with all the lovely people gathered for school kit assembly.
    The assembly drive starts with dumping all the stationary and bags into inventory room at Balshikshan School. Quality checking of bags is something very crucial. Zips, stitching, Belts everything is checked so that no kid gets a substandard bag… The defective bags are sent back for repairs. Good bags go to the next level where stationary including 9 notebooks, crayons, drawing book, compass box is filled in the bag. The bag is now assembled and sent back to the storage room. The last thing in the drive is distribution according to requirement.
    Yeah, I know what I penned down seems very dry but just be a part of process and you know how romantic it is to be part of it! The discipline, the team work, the bonding, the mutual understanding, the friends… all we get just enriches life a li’l more every day. The great people who visit the drive and motivate the volunteers give the feeling of Pride as well as responsibility. The breaks and fillers … Ahh ! They are just bliss! May it be group song led by Nitin ji or Manik Tai… some fun filled activities, some artists performing with their instruments and passion, may it be listening to our very own and dearest Atulji, May it be listening to Vivekji and feeling the blood running with more speeds out of motivation, May it be great nos. of donations received, shared by Dada Lele and Mrudula tai, May it be teasing by Anandji or Hetal ji…..May it be an excellent idea of Lipdub by Hetalji.... May it be watching kids doing kitting activities for other kids of their age, May it be lunch together…. The common factor is “those beautiful smiles” …on all the faces… smile of happiness, smile of pride, smile of emotional and social bonds, and smile of making a real difference…. You can’t feel it till you come there J It’s all about people and you know it only after being with them…
    But this is not all about school kit drive… School kit drive has given me something new every year… I remember, first and foremost year, I met Atul ji… founder of SS…. That has been probably the greatest reward I have ever got. Eventually every year I met many good friends. I was fortunate enough to learn many management fundamentals here in last few years. I have been blessed enough to explore my own qualities after meeting like minded people. I have been cherishing artist hood with some cool artists and great audience at Seva Sahyog… But this year is special… This year… many people came forward for yearlong activitiesin urban slums. We could find many hidden writing artists within us… Some first timers, some experts… but all were equally passionate about sharing their feelings through blogs… some were informative … some were cute… some were touching…. 

I can go on writing about this for ages… School kit drive and SS has made me better person every day… And I assure you will share the same feeling … wanna experience it? Come … we will meet this Sunday for sure……








Monday 21 April 2014

Educate! Encourage!Enlighten!… School Kit Drive… Behind the Scene….


    “Ahh ! Now we have some time to breath…” Everyone in Seva Fair team thinks after the event is over just before Diwali. That’s when the time running out  sends a suttle smile and whispers ,” oh lad… no way… you have to start with Seva Darshan so that you are prepared for School Kit Drive.”
Yes .. The month of January , Month of new year comes with new dreams, new energy , new horizons… and with Kishorji’s mailer with title “ Kick off meeting for School Kit drive”.  The system gets the alert and everyone in Seva Sahayog starts thinking about School kit drive… the most popular and magnetic show of the foundation… the event which connects us to maximum number of volunteers… the event which is entry point for people to get connected with some social cause or the other.
    Now those who know the drive will say the drive is always in the month of May and June… so what is it that starts in the month of Jan? Yes, for me too, the School kit drive meant School Kit assembly and distribution, 4 years ago.It was about the fun at kitting program with 200+ people together on every Sunday in May and then distributing the kits in June… Now when it’s not just event but  a part of my system… moments and efforts put by volunteers, behind the scene, become inevitable part. May it be drama, show, or any event…details behind the scene makes everyone curious… So here’s the story of school kit drive…. Behind the scene….
    So, as I mentioned it starts with Kishorji’s mailer to invite core team for kick off meeting. (Kishorji is back bone of every event happening in SS so if you are connected to him… you will not miss any updates.)
The first foremost job is to form a team which will lead and take the drive to the success. Seva Sahayog is all about volunteer driven work and that implies dedicated long term volunteering. Atulji and other core team members have put a lot of effort and the thoughtful ways in everything about SS. They know that success lies in connecting and retaining the people and using their strengths. So here is the best way for firm bondings… trust people and give them responsibility. Yes, newly joined volunteers during the year are generally the members of this team. Once they drive one event they don’t leave the family. Founders and seniors are ofcourse there to help but this creates trust in what we do and this also gives importance as well as sense of responsibility.
    And the team is formed… new energy, new vigor… and loads of work to do. The work is divided roughly into 7 different catagories… Requirement analysis of school kit(NGO Connect), MARCOM(marketing and communication),CSR connect , donation collection ,Procurement,Assembly management, Distribution management. People are welcome to choose the department of their interest and one of the team members lead respective teams. Chief co-ordinator is of course “THE RINGMASTER”  to make sure that everybody is on track & just in time frames…
     Then the weekly meetings, updates, tea parties at office and dedicated efforts in respective areas…. NGO connect team starts gathering the requirements from the NGOs while CSR connect team makes every effort to connect to the corporate world and help donation team to gather the most required factor …. THE FUNDS…Donation team is backed by every one irrespective of teams to get the donations required. MARCOM team plays key role in drafting the effective mailers, creating innovative posters and pamphlets, inviting some “role model” kind of people so as to keep the people motivated, making the best use of technology and innovative ideas to create story videos ,banners… Social media is one of the key factors helping this team to spread the word around the world…Distribution team decides where, when, how much, how to give… Deciding the reach of course depends on funds collected and accordingly….
 Procurement team manages to get us everything we want… receipt books, bags, note books, pencils, crayons, mattresses, fans, ohh and what not… And the Assembly team, they are the HEROS …. They are on screen managing people, managing actual kitting on field, making the kitting interesting enough so that people keep coming, planning the games and breaks and managing lunch and beverages for all 300-400 volunteers…..every Sunday.



No job is easy and less important… All of us go hand in hand… support each other…spread the word about the drive everywhere possible…get donations…. enjoy doing every small task …..and Be proud of ourselves and each other…. Yes we are the one blessed who see the smiles on those innocent faces in the month of June.. We see those right from kick off meeting in our hearts…..And the month is over…. Wohhh…. The clock runs soooo fasttttt…. And here starts the assembly drive …. Shooting, Editing , technical stuff all in place…..The 70mm movie is now about to start…. Next week…. But yes you can still be on the screen … THE HEROS of this film….. How? Stay tunned for the sequel of this post or better join the drive directly on coming Sunday…. Explore yourself starting from
27th April 2014…. Educate…Encourage…Enlighten…… Happy Kitting……






Sunday 12 January 2014

अमृताचा वसा....



पसायदान.... प्रत्येक ओवीवर आयुष्यभर अभ्यास होऊ शकेल इतकं ज्या निर्मितीमधे सामावलं आहे असं अद्भुत सृजन... पसायदानाबद्दल काही बोलावं ,लिहावं हा माझा अधिकार नाही, परंतु जे या अमृतापासून वंचित आहेत त्यांना मला झेपली तेवढी...थोडी गोडी चाखता यावी म्हणून हा अट्टाहास...

आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे
तोषोनी मज द्यावे, पसायदान हे ॥१॥

ज्ञानेश्वरीचं लिखाण पूर्णत्वाला जाता जाता माउलींनी देवाकडे हा वर मागितला आहे. ते म्हणतात,"विश्वाला व्यापून उरणाऱ्या परमेश्वरा, मी जो हा ९००० ओव्यांचा, शब्दांचा यज्ञ तुला अर्पण केला आहे त्यानं तू प्रसन्न व्हावंस आणि प्रसन्न होऊन मला मी मागत असलेल्या प्रसादचं दान द्यावंस."

जे खळांची व्यंकटी  सांडो, तया सत्कर्मी रती वाढो
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे॥२॥

       भगवंतापेक्षा भक्त कसा सहज मोठा होऊन जातो याचं ही ओवी प्रमाण आहे. एकदा, हनुमंत प्रभू रामचद्रांना म्हणाले,"भगवंता, तुमच्यापेक्षा माझी तुमच्यावरची भक्ती महान आहे." भगवंत म्हणले,"कसं ते ही सांग." यावर हनुमंत हसून उत्तरले," तुम्हांला समुद्र पार करता यावा म्हणून मला सेतू बांधावा लागला, पण मी फक्त तुमचं नाव मनापासून उच्चारलं आणि तोच सागर विनासायास लंघून गेलो. मग माझी भक्तीच श्रेष्ठ नव्हे का!" देवापेक्षा भक्ताची उंची अधिक व्हावी याचं हे एक उदहरण आणि माऊली दुसरं...
        गीता सांगताना भगवंत स्वतः म्हणतात, " परित्राणाय साधूनाम्,विनाशायच दुष्कृताम्,धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे" म्हणजे... सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुष्टांच्या विनाशासाठी मी प्रत्येक युगात अवतरतो...असं भगवंत अर्जुनाला म्हणतात...आणि माऊली याच भगवन्ताला मागणं मागतात की हे भगवंता, जे खल आहेत, दुष्ट आहेत , दुर्जन आहेत त्यांची व्यंकटी म्हणजे दुष्टावा, वक्रता, वाईटपणा फक्त गळून पडो...आणि त्यांची चांगल्या कामांमधली आवड वाढत राहो. इथे देखील माऊलींच्या विश्वासाची उंची लक्षात येते. ते आवड वाढत राहो म्हणतात तेव्हा मुळात चांगुलपणाची मूलत: प्रत्येकाला आवड असते हा दृढ विश्वास नकळतपणे त्यांच्या विचरांमधून व्यक्त होतो. तर प्राणिमात्रांचा दुष्टावा संपून, त्यांची सत्कर्मातली रुची वाढत जावो आणि त्यायोगे सर्व जगात लोकांचे सात्विक संबंध असोत, एकमेकांशी शुद्ध मैत्र, सोदार्ह जुळो असं मागणं ज्ञानोबामाऊली ईश्वराकडे मागत आहेत.
       पवित्र्याचं आणखी एक प्रमाण देखील याच ओवीमधे मिळतं. माऊली सर्वांत प्रथम त्या लोकांसाठी दान मागतात ज्यांनी काहीतरी वाईट कृत्य केलं आहे; कदाचित त्या लोकांसाठी ज्यांनी माऊली आणि त्यांच्या परिवाराला वाळीत टाकलं होतं.

दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो
जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणिजात॥३॥

प्रार्थनेत पुढे ते म्हणतात,"वाईटाचा अंधार नष्ट व्हावा, आणि हे सर्व जग स्वधर्माच्या तेजाने उजळावं.सर्व प्राणिमात्रांच्या ज्या ज्या इच्छा असतील त्याही पूर्ण व्हाव्यात."
         इथे स्वधर्म म्हणजे प्रथमदर्शनी धार्मिकता, पूजा अर्चा असा भाव आहे असं वाटू शकतं परंतू तो अर्थ माऊलींना अपेक्षित नाही. स्वधर्म म्हणजे जगताना आपल्याकडून अपेक्षित असलेली कर्तव्यं.आपली भूमिका यथास्थित पार पाडणं; आपल्या कामात संपूर्ण निष्ठा असणं याला ते स्वधर्म म्हणतात. कित्येक शतकं उलटली तरी, द्रष्टा असलेल्या, विद्वान असलेल्या व्यक्तीचे विचार कालबाह्य होत नाहीत हे सांगणारा हा विचार... आज तरी काय वेगळं करण्याची गरज आहे, विद्यार्थ्यानं डोळसपणे अभ्यास करावा. मोठ्या माणसांनी वरकमाईची अपेक्षा न ठेवता नेटानं जबाबदारी सांभाळावी. कुणीही स्वच्छतेच्या,संविधानाच्या नियमांना डावलू नये या पेक्षा वेगळा स्वधर्म तो काय!!! आणि मग सर्वच स्वधर्माचं भान ठेवून असतील तर, जे वांछित आहे, इच्छा आहेत त्या सदिच्छाच असणार असाही विश्वास या संतश्रेष्ठाला वाटत असला तर नवल ते काय...

वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी
अनवरत भूमंडळी, भेट तू भूतां ॥४॥

मग माऊली म्हणतात," सतत मांगल्याची पखरण करणारी,परमेश्वराच्या प्रेमाची भक्तीची पालखी वाहणारी मंडळी प्राणिमात्रांना अविरत, अखंड भेटत राहोत."
        यावेळी सुद्धा,ईश्वरनिष्ठा म्हणजे कर्मकांड किंवा कुठल्याही चाली-रीती असं त्यांना म्हणायचं नसून, प्रत्येक जीवात परमेश्वराचा अंश पाहणाऱ्या व्यक्ती असाच विचार माऊलींना अभिप्रेत आहे. ही "ईश्वरनिष्ठांची मांदियाळी" म्हणजे नेमकी कोणती माणसं,त्यांचे गुण कोणते, लक्षणं काय... हे सर्व पुढच्या २ ओव्यांमधे स्पष्ट होते.

चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणिचे गाव
बोलते जे अर्णव, पियुषांचे॥५॥

चंद्रमे जे अलांच्छन, मार्तंड जे तापहीन
ते सर्वांही सदा सज्जन, सोयरे हो तू॥६॥

या मंडळींचे गुण सांगताना माऊली म्हणतात,"ज्या लोकांचं अस्तित्व म्हणजे जणू कल्पतरूंचं उद्यान आहे,ज्यांच्या चैतन्य जणू सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या चिंतामणीचं वसतीस्थान आहे,ज्यांची वाणी म्हणजे साक्षात् अमृताचा कधीही न संपणारा समुद्र आहे,ज्यांच्या ठायी चंद्राची शितलता आहे परंतु त्यांच्या व्यक्तित्वावर एकही लांच्छन(डाग,कलंक) नाही,जे साक्षात् तेजस्वी सूर्यनारायण आहेत परंतु त्यांच्या अस्तित्वाने कुणालाही त्रास होत नाही,जे तेजस्वी असूनही बोचरे नाहीत; असे सज्जन सर्वांचे सोयरे असावेत. अशा लोकांचा इतरांना सतत स्नेह मिळावा,साथ मिळावी."
       जसं एखाद्या पवित्र वास्तूमधे आपल्याला शांत वाटतं, प्रसन्न वाटतं... तसंच काही व्यक्तींबाबतही होतं.त्यांच्या नुसत्या जवळपास असण्यानेसुद्धा वातावरण चैतन्यमय ,प्रसन्न,सगळ्या चिंता मिटवणारं वाटतं,समाधानी वाटतं. हे लोक बहुतेक वेळा पूर्ण समूहाचं हित स्वार्थाच्या आधी बघतात. अशीच व्यक्तिमत्वं ज्ञानोबारायांना वर्णायची असावीत.
     आणि मग या लोकांचा सहवास मिळून ,लोकांमधली सत्कर्माची आवड वाढून पुढे काय घडावं हे माऊली यानंतर सांगतात.

किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिन्ही लोकी
भजिजो आदि पुरुषी, अखंडित॥७॥

माऊली म्हणतात ," सगळीकडे मांगल्याचा वास झाल्यावर या जगातले सर्व प्राणिमात्र सुखी व्हावेत आणि त्यांच्या मनात सतत, आद्य पुरुषाच्या म्हणजे भगवंताच्या भक्तिचा वास असावा. स्वतःची भूमिका बजावत असताना,लोककल्याणाकरिता काही करताना सतत परमेश्वराचं त्यांना स्मरण असावं."
     परत एकदा, परमेश्वराची भक्ती म्हणजे दर वेळी जप-जाप्य,होम-हवन,प्रार्थनास्थळाच्या भेटी हे माऊलींना खचितच् अपेक्षित नसणार. आपली रोजची कामं करताना  कधिही मनापासून आपल्या श्रद्धास्थानाचं स्मरण करणं असंच् त्यांना म्हणायचं असणार.

आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी ईये
दृष्टादृष्ट विजये, होआवे जी ॥८॥

आता ते शेवटचं दान ईश्वराकडे मागत आहेत,"हा ग्रंथ जो भक्तिने वाचतील,ज्यांच्यासाठी हा ग्रंथ(ज्ञानेश्वरी) विशेष आहे,जे या ग्रंथाची उपासना करतील व त्यानुसार आचरण ठेवतील त्यांना दृष्ट,अदृष्ट यावर विजय मिळावा. भौतिक सुखाबरोबरच त्यांना आत्मिक समाधान लाभावं. त्यांच्या ठायी स्थितप्रज्ञतेची शक्ती असावी."

येथ म्हणे श्रीविश्वेश्वराऒ, आ होईल दानपसाऒ
येणे वरे ज्ञानदेवो सुखिया जाला ॥९॥

आणि सगळं मागणं मागून झाल्यावर जेव्हा ते भगवंताला विचारत आहेत की हे सगळं त्यांनी जे हट्टानं , हक्कानं साकडं घातलं ते पूर्णत्वाला जाईल का, हा वर, हे दान त्यांना मिळेल का; त्यावर त्यांना ईश्वरस्वरूप असणारे त्यांचे गुरू ,त्यांचे थोरले बंधू ’निवृत्तीनाथ’ हे त्यांचं मागणं जरूर पूर्ण होईल असं विश्वासानं सांगतात. गुरू म्हणजे साक्षात् परमेश्वराचीच वाणी या भावनेनं आपण मागितलेलं  दान आपल्या पदरात पडणार म्हणून माउली परमसुखाचा अनुभव घेतात....
 सर्व जगाच्या हितातंच स्वतःचं परमसुख शोधणारे असे पवित्रात्मे विरळाच्.... माऊली आणि त्यांचे विचार अभ्यासावेत तेवढे दर वेळी वेगळे,जास्त जास्त उदात्त वाटतात. त्यांच्या व्यक्तित्वाची झेप सामन्यांना झेपणं कठीण खरं पण त्यांच्या पाऊलांचा माग घेत पुढे जाणं तर आपल्या हातात आहेच ,नाही का? वाट शोधणे आयुष्यभराचेच पण तूर्तास इतुकेच....



Sunday 21 July 2013

When I see your imprints…

Of course I do believe you are there… but in the rush of routine when I tend to forget your existence, I know you have your own weird ways to show it. I know you become mightier than ever and make me realize that I am part of yours & can’t have discrete identity. I have now understood the way you come in front of me….

When the life is full of tottered steps and I feel it to be tyranny predestined; it’s the very time when I have forgotten to say Hi & send regards to you. When it seems to be the darkest of times, when the world seems to be attacking with full pace; when nobody seems friendly; when the world throws handful of mud; when I get topsy-turvy by the blame or fame; when I can’t get deaf to the scandals; when neighbor’s curtness affects me; when I don’t feel sympathy in other’s woes; when I forget to love me and others…when the ways hide themselves in the thick cloak of mist, the mist of uncertainty and nothing seems right….

Out of nowhere, the ray of light runs through the mist like a sword and the through the torn cloak, I see your candid smile. I get myself back & every peril seems so small and I again discover the strength to conquer. A stable me replaces the vulnerable me. That’s the very moment I re-realize that I’m not lonely, though alone!!!


When you lift me in your cozy arms, when I feel blessed, when I see you crossing the hurdles for me…. You and I don’t remain two anymore. Your beauty enlightens the heart & journey becomes wonderful again. Every time I dare to forget you, I end up believing in you more & stronger …. And ‘THANK YOU’ doesn’t suffice as amazing becomes life when I see your imprints….