मुंबई टुडे मधला कौशलदाचा "वरदानाचा शाप"हा अप्रतिम लेख वाचला...आणि त्यातलं सगळ्यात अप्रतिम आणि अप्रतिम म्हणण्यापेक्षा जबरदस्त भिडणारं वाक्य म्हणजे चार्लि चप्लिनच्या लाईम लाईट या चित्रपटामधलं.....
.....रंगभुमिला कंटाळलेला एक कलाकार आपल्या बरोबरच्या नटीला रंगभुमिबद्दल भरभरुन सांगतो....
तिने त्याला नेहमी वैतागलेल्या अवस्थेत बघितलेलं....
गोंधळून ती म्हणते "आय थॉट यु हेटेड थिएटर".....
आणि त्यावर त्याची प्रतिक्रिया,
"आय हेट साईट ऑफ ब्लड,बट ईट रन्स् इन् माय व्हेन्स् "
.....हॅट्स् ऑफ....
एखाद्या वाक्यात आयुष्याची फिलोसॉफी सांगणा~या त्या नेमक्या विचारांना आणि त्यामागच्या माणसाला धन्यवाद तरी कसे द्यायचे...हे ऋणानुबंध फक्त अनुभवायचे...आणि रात्री पाठ टेकण्याआधी आपल्या आयुष्याला सतत वेगवेगळ्या मार्गानं आधार देणारे विचार आणि त्यामागची माणसं बनवणा~या देवाचे आभार मानायचे.....
तत्वज्ञान वगैरे तर राहो बाजुला ....पण ही इतकी साधी गोष्ट जर रोजच्या प्रत्येक कामात लक्षात ठेवली आणि आमलात आणली तर आयुष्य किती सुंदर होईल!!!!!!!!!
म्हणजे माझ्यापासुनच सुरुवात करू..... माझ्यासारख्या मैदानाच्या धुळीत रमणा~या,किल्यांच्या दगडात आनंद शोधणा~या मुलीला येत असुनही स्वयंपाकघरात काम करणं खरोखरी अचाट कंटाळवाणं होतं हे कसं सांगावं..... पण अताशा घरच्या खवय्ये लोकांच्या चेह~यावरचा आनंद बघण्यासाठी स्वयंपाक चांगला करणं अंगवळणी पडलंय...
हेच सगळं करीअर निवडतानादेखिल होतं.... माझा १ मित्र सॉफ्टवेअरच्या जगातल्या एका खुप मोठ्या नावाजलेल्या फर्म मधे सगळ्यात आधी लागला...त्यावेळी आम्ही जळत होतो ..सगळेच....
आज त्याला तिच फ़र्म कधी सोडतोय असं झालयं......त्याच त्याच गोष्टी काही काळ कराव्या लागणार यात काही नवल नाही....फ़र्म बदलली म्हणून हे टळेल का? हे जग आता स्वत:मधून हुसकवून लावणं शक्य नाही हे कळल्यावर त्याची चांगली बाजू शोधायचा प्रयत्न करायला काय हरकत आहे?
जे रक्त सतत आपल्या शरिरातच रहणार आहे....त्यात आवश्यक सगळे घटक आहेत की नाहीत...हे बघुया.... रोजच्या जीवनात ते पुरेपूर सापडणार नाहीतच....पण म्हणून काय लगेच कुणी डायलिसिसचा विचार करेल का?
लोह कमी असेल तर खजूर खा....उष्मा कमी असेल तर बदाम खा असे उपायही असतातच की.....जगण्यात याच उपायांना आपण छंद नाही का म्हणत...एखादं गाणं,एखादं पुस्तक,एखादी सहल,एखादं चित्र,एखादं छायाचित्र,एखादी मैफल......चला काहीतरी असं शोधुया ज्यायोगे रक्त नुसतं वाहणार नाही तर सळसळेल....आणि फक्त आपल्या कंटाळ्याची साक्ष न बनता...उत्साहाचीही साक्ष बनेल......आणि आयुष्य सतत लाईम लाईट मधे राहील....
अप्रतिम... आणि १००% सहमत... गेल्या वर्षी पासून माझ्या डोक्यात (!!!) असेच विचार येत आहेत... काहीतरी नवं करावं, आयुष्याच्या सध्याच्या ट्रॅकवरुन धावतांना आजुबाजूची झाडं तरी पहावीत... तेवढंच आयुष्य रंगीबेरंगी होईल...
ReplyDeleteमांडलेले विचार छानच आहेत... ते तेवढेच प्रभावी लिहीणं महत्त्वाचं... ते कौतुकास्पद जमलंय. पुढच्या पोस्टची वाट पहातोय...
thx dear[:)]... wishay tayaar ahe..pan somehow lihila jaat naiye ...nyway....u wud always b one of the first few readers
ReplyDelete