
विट्ठल नामाचा गजर … डोळ्यात भक्ती … पायात आलेली अमानवी शक्ती …. मला जाम अप्रूप आहे या वारकर्यांच … आणि मला हे कधी जमणारच नाही असा न्यूनगंड पण … दर वर्षी वारी येते दर वर्षी हे विचार सुद्धा … पण त्या सावळ्या विठुरायाच रूप मात्र सतत खुणावत राहतं … याची देही याची डोळा भेट व्हावी म्हणून त्याचीच करुणा भाकायची …. कायमचाचं खेळ हा…
आणि ते रूप इतकं सहज दिसेल हे कुठे ठाऊक होतं मला… एक कोवळं हसू … एक उबदार मिठी …. डोक्यावर हात ठेवला की वाटावं कि त्या सम:चरणांना स्पर्श झाला… असं त्याचं सर्वांग सुंदर दर्शन… आणि ते ही कुठे … झोपडपट्टीमध्ये ????

हो ...तो तिथेही भेट्तो…. तो खरतर कुठेही भेटतो … मला तिथे भेटला … नवीन दप्तर मिळाल्यावर चमचमत्या डोळ्यात … गाणं म्हणून दाखवल्यावर फुललेल्या चेहऱ्यात … शनिवारी परत येते म्हणल्यावर खुललेल्या त्या निरागस हसण्यात …. मी खूप शिकणार ताई असा म्हणत मारलेल्या त्या कोवळ्या मिठीत … सगळी कडे माझा पांडुरंग च तर आहे…
देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई …. असं संत म्हणाले खरं … पण ती पुण्याई उभं करणं इतकं सहज असेल असं विट्ठलाची ही रूपं पाहीपर्यंत जाणवलंच नाही कधी 
माझी वारी …. दर आठवड्याची … माझा श्रीरंग तिथे त्या वस्तीत भेटतो मला… लोक त्याला School Kit distribution म्हणोत किंवा सेवा सहयोग चा समुत्कर्ष प्रकल्प ….
माझी मात्र ती वारीच …. विठू माउलीचं सावळं दर्शन घडवणारी … जगायला उमेद देणारी … सुखाचे ते सुख … त्या पावलांच इथेच रूप साकारणारी …. माझी वारी …
खूप सुंदर... शीर्षक समर्पक, 'ती' वारी आणि 'ही' वारी यातला परस्परसंबंध खूप छान झालाय.
ReplyDeleteA small and 'to the point' blog i can say...
keep writing.
- मंदार
Great job :)
ReplyDeletethank you manish
DeleteKhup Chan !
ReplyDelete:) thank you
Deleteव्वा....
ReplyDeleteभाग्यवान आहेस.. :)
Yeah. ..lucky for sure.... get chance to meet the kids an moreover people like you take note of my writing :)
Deleteअगदी माझ्या मनातलं लिहिलं आहेस.
ReplyDelete:) that's gr8... and was a pleasure meeting you
Delete