"मा… ज …. डोक्यात हवा गेलीये त्याच्या … स्वतःला फार शहाणा समजतो… email, whatsapp, facebook...त्याचे पोस्ट आम्ही वाचायचे… पण तो ढुंकून नाई reply करत …. तो न फार वरणभात आहे यार…. हिचं सगळं फार च भडक असतं …. तिचं अमक्या ढमक्या बरोबर लफडं आहे माहिते का … त्याचा divorce झाला म्हणे … यांच काही कळत नाही …. सगळे कलाकार इकडून तिकडून सारखेच …."
किती सहज, comments किंबहुना judgments pass करतो नाई आपण ! कलाकार मग तो कुठल्याही क्षेत्रातला असो, एका विशिष्ट उंचीवर पोचला की हे सगळं किंवा याहीपेक्षा जास्त त्याच्या बाबतीत सहज बोलून जातात लोक…. मुळात त्या कलेबद्दल आपली योग्यता काय ,आपण त्या कलाकाराला किती ओळखतो, आपण पैसे मोजून ,किंवा अगदी फुकट तरी त्या कलाकाराची कला जाणून घ्यायचा प्रयत्न तरी केला आहे किंवा नाही….
याचा तर नाहीच पण त्या व्यक्तीचा किमान माणूस म्हणून तरी विचार करतो का आपण ?
कलाकार तर आहेच की , पण फक्त त्याची कला म्हणजे तर तो माणूस नव्हे…. त्या कलेशिवाय असतीलच की त्याच्याही व्यक्तिमत्वाचे पैलू … कदाचित गर्दीला सहज सामोरा जाणारा तो… एकट्या माणसाशी नसेल बोलू शकत फ़ार… आपण १००० लोकांसमोर बोलू शकतो का त्याच्यासारखं … "अरे हसत पण नाही दिसला रस्त्यात तर " …. नसेल हसत… आपण किती अनोळखी चेहऱ्यांना आजवर असा smile दिलय …. उलट असं कुणी अनोळखी हसलं तर त्याच माणसाला वेडसर ठरवून मोकळे झालो असू कित्येकदा …. असतील कदाचित त्याच्याही डोक्यात त्याचे, तुम्हाला माहित नसलेले, विचार …. कदाचित एखादी विवंचना असेल…त्याच्याही घरात असू शकतील छोट्या मोठ्या कुरबुरी ….तुमच्यासारखे आणखी हजारो लोक रोज पत्र, फोन करून भंडावत असतील … कदाचित काहीच निर्माण होत नसेल त्याच्या हातून नवं … किंवा खूप काही उमटत असेल आतल्या आत… त्याची अस्वस्थता असेल… कुणाचे तरी शब्द भिरभिरत असतील डोक्यात किंवा नसेल काहीच … असेल स्वतःच्या धुंदीत … राहू दे की … तुम्ही नसताच का कधी असे हरवलेले …
office मध्ये document keeping ची साधी पद्धत बदलली तर साहेबाला शिव्या घालणारे आपण … किती अधिकाराने त्याच्या एकसुरी निर्मितीची तक्रार करतो…. आवडतं एखाद्याला नुसतं सूर्यास्त रेखाटण … किंवा आवडत असेल एखाद्या संगीतकाराला "यमन" सगळ्यात जास्त ….एखाद्याला ढोलाशिवाय नसेल आवडत गाणं…. आणि एखाद्याला आवडत असतील फक्त मंद आलाप …. म्हणून लगेच तो वरणभात तरी किंवा फक्त तांबडा रस्सा तरी …. तुमच्या कामात रोज फुलतंय का इंद्रधनुष्य … त्याच्या कार्यक्रमांना downmarket म्हणा … जरूर … पण त्या आधी … त्याने १०० केले असतील …तुम्ही १० कार्यक्रम तरी houseful करून दाखवा …
"नुसता पैश्याच्या मागे असतो … फायद्याशिवाय बोलत नाही अजिबात !" त्याच्याही घरात तुम्हाला लागतं तेवढंच धान्य , भाजीपाला , दूध ,सुखसोयी लागतातच , कलेतून आनंद देतो समाजाला … म्हणून त्याला घरपट्टी , विजेचं बिल , मुलांचं शिक्षण हे फुकट मिळत नाही … (कलाकार, अशी जात, अजून तरी आरक्षणाच्या यादीमध्ये दिसत नाही कुठल्याच फोर्मवर )…. आणि कुणी सांगावं याशिवाय कौतुकाबरोबरच मानधन ही बुडवणारे , भेटले असतील नग त्याला …. त्याचं वार्षिक appraisal करणारा साहेबही नसेल आणि कुणी ….
"त्याने सोडलं म्हणे बायकोला …. तिची लफडी आहेत म्हणे फार " … अरे कोण म्हणे …. तुका म्हणे कि नामा म्हणे … म्हणून इतकं महत्व त्याला ? आणि मुळात … दरवाजा न वाजवता वडील खोलीत आले तरी चिडणारे आपण … आणि मित्रांचे मेसेज आईने वाचू नयेत म्हणून प्रत्येक app ला password चिकटवणारे आपण …. कुणीतरी फक्त प्रसिद्ध आहे किंवा तुम्ही त्याचे तथाकथित सर्वात भारी चाहते आहात म्हणून किती डोकावणार त्याच्या आयुष्यात ….
मुळात त्याने त्याच्या कलेतून खूप आनंद दिला आहे म्हणून तर आपल्याला त्याच्याशी बोलावं , भेटावं वाटतंय ना … तुम्ही कधीही न मागता त्याने तो पैशात न मोजता येणारा विरंगुळा तुमच्या स्वाधीन केलाय ना …. तुमचे मूड्स सांभाळत वाहतंय न त्याचं गाणं , संगीत, शब्द किंवा चित्र … आणि तुम्हाला काय द्यायचंय परत …. कदाचित काहीच नाही … अगदी कौतुक सुद्धा न मिळता तो करतोच आहे श्रद्धेने सगळं … त्याचा चालूच आहे प्रवास … आणि तुम्ही बरोबर असा वा नसा … तो त्याच्या निर्मितीचं फुल पाडणारच आहे तुमच्या पदरात…
मग चांगलं नाही तर बिनबुडाच्या प्रतिक्रियाही नकोच ना द्यायला …. पुढच्या वेळी कुणाबरोबरही , कुणाबद्दलही चर्चा करताना …. वाईट बोलताना…. त्याचा कलाकार म्हणून न करता …. आपल्यासारखाच एक माणूस म्हणून विचार करुया का …. आपल्या एका प्रतिक्रियेने त्याचं पत्त्याच घर कोसळू शकेल …. याची घेऊया का दखल …. नाहीतर आहेच तो ही आणि आपण ही इथेच …. comments पण आहेतच आपल्या हक्काच्या …सोपं आहेच की म्हणणं … "तो न … श्या …"

अप्रतिम... विषयही खूप छान घेतला आहेस, आणि लिहिलंय पण मस्त्त्त :)
ReplyDelete- मंदार
Thank you Mandar... You have always been motivation and a great critic
DeleteKhuuup sundar !! Agadi majhe vichar vachat ahe ase vatale vachtana.. :)
ReplyDeleteItaka sopa vishay.. routine.. pan koni itake apt nahi lihu shaknar kadachit..
Ashi ch lihit raha.. khuup awadel vachayala :)
Hey Rachana ... How do I thank you enough.... but yes your comments give me push to write something more , something right from heart.....everytime
DeleteMast lihile aahes !! Apalya samajatil mentalitycha major problem aahe ha.. phakt kalakar nahi tar konatyahi khsetrat kahitari wegale karu pahanaryala he face karave lagate khupada.. Rashmi
ReplyDeletetrue Rashmi.... was thinking of some comment about 1 artist... so probably focus went there.. but what you say is very apt.
DeleteSuper like mane khup mast lihila ahes and now can't wait more for next one :)
ReplyDelete:) will try and write regularly Swati....
DeleteKhup chhan lihilayas Manasi!!! Keep it up.
ReplyDeletehey .. nice to hear from you Mandar... Thank you so much
Deleteapratim !!! wachtana far maja yet hoti... kharokhar loka timepass mhanun kinwa kahitari wishay milawa mhanun dusryanchya jiwnache wabhade kadtat...
ReplyDelete… "अरे हसत पण नाही दिसला रस्त्यात तर " …. नसेल हसत… आपण किती अनोळखी चेहऱ्यांना आजवर असा smile दिलय …. उलट असं कुणी अनोळखी हसलं तर त्याच माणसाला वेडसर ठरवून मोकळे झालो असू कित्येकदा ….
ReplyDelete.......छान लिहिलयस ……. नक्कीच विचार करायला लावणारं आहे..........
व्वा... मस्त! !!!
ReplyDeleteहे सगळं आमच्यासारख्यांच्या डोक्यात किंवा कधीतरी बोलण्यात येत असतं, पण लिहिणारी पहिली तूच...
:)