Thursday, 17 December 2015

Juvenile.... Yes, he was the one, then.....



Ohh , why do they react so much? It was just a bad day... 

He did not commit crime ... it just happened ... after all he was just a Juvenile .... 
Moreover ...it was her crime ... has always been hers..... being a girl is a big crime in itself,isn't it!!! and she was a professional ... Ahh! ...that's evil in fact.... don't they understand this?.... and he ... he was just a juvenile.... 

she was wearing ethnic suit and she was looking stunning.... cherry on the top ... she was travelling at late hours.... She thought that she is safe in public vehicle.... how stupid of her.... she needed punishment for such a foolishness ...isn't it? and this juvenile just made sure that she was punished enough.... 

He thought she was just another "thing" to be used... so what ...he was just a juvenile....
She tried to be reluctant and she tried to honor herself.... how dare she? She should have surrendered and he would have raped her and left her alive .... He was a juvenile after all....
But no, she rebelled , she tried to save herself.... she tried to oppose.... Such a bad lady she was.... she fought for her existence ... and then, he left with no other option .... she had to be punished....

So this loving juvenile made sure that she was stripped ... and she was beaten after she was raped.... he made sure that every ounce of her uterus and every drop of her blood came out of her body .... and she was made to pay the cost of being what she was.... she was left thrown to suffer... her only supporter was also beaten for he tried to help her..... but you know, nobody should curse him.... he was just a juvenile and did not know any other way to punish them ......

But then demography out here is bad.... they made the system put him behind the bars.... how could they.... he was just a juvenile.... but now see, by god's(or system's?) grace... he would be set free soon... he would be helped by our system for his better and serene future.... and may be he would now punish some other girl for her crime of being a girl ....  

They should be thankful and grateful to the system which sets him free ....why do they react so much..... after all he was just a juvenile then....

No ... don't try to relate it to any ONE incidence.... it has been happening here for years together ....and I need help to understand something.....

 I am a little confused as to what did I learn for so many years.... My vocabulary is too bad I discovered..... I never knew that "juvenility" and "lesions" are synonyms .... I never knew that morbidity is part and parcel of "not being a grown up and adult by law" ..... 

Coz .. you know ... I can't call myself descendant of people like Shivaji maharaj and Maharana Pratap.... who were ready to die in the name of Honor of every citizen and a criminal was a bloody criminal for them.... age, gender, caste .... no bar..... 

Will somebody help me and lemme know ... whom to call JUVENILE..... and what kind of acts are not considered to be crime if done by this loving juvenile ?????????????


 


Thursday, 23 April 2015

धन्यवाद व.पु.


"अस्वस्थता त्रास देतेच... पण त्या अस्वस्थतेचं कारण माहित नसेल तर, आणखी तगमग.... " (हे देखील व.पुं.चीच प्रतिभा... मला फक्त पटलेली)

आज हे का आठवावं... तर मन अस्वस्थ होतं म्हणून... आणि सुदैवानं कारण ही माहित होतं म्हणून नव्यानं व.पु. मय ... पुन्हा एकदा....
आणि अस्वस्थ कशामुळे हे मन नावाचं माकड.... तर लिहिता येत नाही म्हणून....म्हणजे जितकं मनात येतं ते सगळं लिहिता येत नाही म्हणून....

किती आहे खरं तर कागदावर उतरावं असं.... आकाशाची व्याप्ती असलेली माणसं... आपल्या माणसासारखा मिठीत घेणारा पाऊस.... पावसासारखा निरामय करणारा समुद्र.... कुणाचे तरी समुद्राइतके अथांग डोळे.... एखादं डोळ्यांपेक्षा बोलकं मौन.... एखादं मौनपेक्षा असीम मन... मनावर गारुड करणारी एखादी संध्याकाळ.... आणि तिच्यापेक्षा सावळा कृष्ण....
पापणी लवेतो लक्ष लक्ष गोष्टी खुणावून जातात.... कागद मात्र चांगदेवाच्या पत्रासारखा... कोराच्...

खरंच् मनापासून लिहावसं वाटतंय आणि काही म्हणता काही लिहिलं जाऊ नये असा हातानं आणि वृत्तीनं पुकारलेला संप.... आणि मग मन बिचारं सगळे पूर , सगळी वादळं सोसत रहातं .... अखंड... मग अर्धे राहिलेले लेख …. न लिहिलेलं एखादं पत्र … कवितेची दीड ओळ …. सगळं आवर्तनं आतल्या आत ….
म्हणून मग अस्वस्थता....

आता ह्यात व. पुं. चा संबंध तो काय.... तर अशा कित्येक अस्वस्थ क्षणांमधून, दोस्त होऊन ,आजवर त्यांनी मुक्त केलं असेल किती जिवांना.... अशावेळी कदाचित व.पु. "टेंपरवारी" कृष्ण होतात...friend ,philosopher, guide and what not.... असंच "रंगपंचमी"च्या रूपानं अलगद "पाय माझा मोकळा" करत त्यांनी आज हा "गुंता" सोडवला....
व.पु. म्हणतात," श्वासोच्छवासा बद्दल लिहा असं कुणी मला सांगितलं तर काय लिहिणार.... ३ च शब्द... ’श्वासोच्छवास होत रहावा’ .... रक्ताचा आणि आयुष्याचा अपरिहार्य आणि सुरेख भाग असणाऱ्या गोष्टींबद्दल इतकंच् लिहिता येतं"



आता मन पाऊस सोसताना पाऊस होईल आणि समुद्राच्या आठवागणिक गाज ....
मौनाबरोबर संवाद होईल अलवार आणि सावळ्या डोळ्यांमधलं दिसेल मोरपीस विनासायास....
फोटो सुरेख खरा पण फोटो काढण्याच्या अट्टाहासापोटी खरोखरचे दृष्य अनुभवायला आणि जगायला विसरायला लावणाऱ्या गुंत्यातून सोडवणाऱ्या या कृष्णरूपाबद्दल तरी काय बोलणार ... इथे ही ३ च शब्द...... "धन्यवाद व. पु."


Friday, 6 March 2015

ब्रेकिंग न्यूज

बरेच दिवस गाजत असलेल्या "ब्रेकिंग न्यूज"वर शेवटी आज पडदा पडला... इतके दिवस ताणल्या गेलेल्या भुवयांनाही .... "काय तरी बाई ऐकावं ते नवलच्... हल्ली कुणाचं काई सांगता येत नाही ... डोंगर पोखरून उंदीरच हो पंत.... " या आणि तत्सम् प्रतिक्रियांनंतर जरा आराम मिळाला..... आणि तिचं काय झालं ... ते काही का होईना... पण महिना १५ दिवस श्टोरी मात्र बेस मिळाली हे तेवढं खरं... तंबाखू , बिडी च्या आवर्तनांपेक्षाही अंमळ जास्तच झाली म्हणायची दिवसागणिक घरी-दारी चर्चा....

तिच्यासाठी मात्र हे सगळं सुरु झालं त्याला काही महिने झाले, ३-४ कदाचित्...घर, संसार, नोकरी, मिळकत, नाती-गोती सगळं अगदी आलबेल असतानाही अचानक तिला वाटलं की आतून, खोल काहीतरी घडलंय.... की बिघडलंय.... ते कळायला वेळ होता अजून पण काहीतरी बदलत होतं हे नक्की. स्वत:शी सतत संवाद असलेल्या तिनं पुरेसा वेळही दिलाच् स्वत:ला सगळ्या शक्यता चाचपडायला, पण जे चक्र आत फिरत होतं ते काही थांबेना. बुद्धी , मन , आत्मा यांचं वेगळं अस्तित्व न जाणवण्याइतपत् एकरूपतेची भावना... मेंदू मधे काहीतरी सतत फिरतंय आणि मोठं मोठं होत जातंय असं काहीसं...ते काहीसं, शरीर झोपलं तरी जागृतच्...अन्नपाण्याचंही भान राहू नये आणि तरी सतत कुठूनतरी शक्ती मिळत रहावी अशी अवस्था...एखादी बॅटरी चार्जिंगला लावावी, आणि तशीच विसरून जावी... मग ती चार्ज व्हावी.. मग ओव्हरचार्ज,मग गरम आणि कालांतराने तिचा स्फोट व्हावा अशीच शक्ती आपल्याही अस्तित्वात जाणवतेय असं काहीसं तिला वाटत होतं... सतत... १५ दिवस.... हो अगदी हल्ली काय म्हणतात तसं...२४*७...सुदैवानं किंवा दुर्दैवानं ती सोडून कुणालाच् यातल्या कशाकशाचा पत्ता नव्हता, मात्र तिच्यासाठी सगळं पेलण्यापलीकडे चाललं होतं म्हणून तिने तिच्या मानसोपचार तज्ञ असलेल्या तिच्या भाषेत... "मनातल्या अळ्या साफ करणाऱ्या" डॉक्टर मित्राला हाक दिली. हो म्हणजे, मानसोपचार तज्ञाची मदत घेणं म्हणजे लाजिरवाणं किंवा वेड लागल्याचं लक्षण असं मानणाऱ्या "शहाण्यां"मधे ती मोडत नाही... :) वरकरणी मानसिकच वाटलेल्या या अवस्थेचं ४ सलग सेशन्स् मधेही निदान होईना म्हटल्यावर तिच्या मित्राने तिला काही आवश्यक रक्त चाचण्या करण्याचा सल्ला दिला. दुसऱ्या दिवशी चाचण्या झाल्या, दोनच् दिवसात तिच्या तब्येतीचं भविष्य ठरवणारा तो कागदाचा तुकडा डॉक्टरांच्या हाती आला आणि इथून खरी ब्रेकिंग न्यूज चं बीज अंकुरायला सुरुवात झाली...  
रिपोर्ट आले आणि एका मोठ्या होस्पिटलमधलं वातावरण ढवळून निघालं. आजतागायत कधीही न बघितलेली गोष्ट सगळे डॉक्टर बघत होते. गेल्या शेकडो वर्षांच्या वैद्यकीय नोंदी तपासून झाल्या तरी काही म्हणता काही कळेना. शेवटी हा रिपोर्ट जगभरातल्या नामी वैद्य, डॉक्टर, रिसर्च एक्स्पर्टस् अशा सर्वांनाच पाठवण्यात आला आणि लवकरात लवकर काही उपाय कळवावा अशी विनंतीपर पत्रही गेली.पैसा आणि प्रसिद्धी यापेक्षाही आजवरच्या ज्ञानाला मिळालेलं आव्हान म्हणून जगभरातले मेंदू त्या एका कागदाच्या तुकड्याकडे बघू लागले. आणि त्रिखंडामधल्या "मिडिया"नामक राक्षसीची भूक भागवणारी "ब्रेकिंग न्यूज" झळकली... काय असेल तिच्या रक्तात.... आजतागायत् कधीही न दिसलेल्या या घटकाचं नाव तरी काय... काय म्हणतात डॉक्टर!!! " वगैरे वगैरे वगैरे....

हो, आजवर कधीही न आढळलेला असा अनामिक घटक तिच्या रक्तात दिसला होता. आणि गेला महिना दीड महिना तिची स्वत:शीच् चाललेली झुंज स्वत:शी नसून या अनामिक घटकाशी आहे हे नव्यानं तिला जाणवलं... ज्याला नाव नाही, गाव नाही, रूप नाही,आकार नाही, उगम नाही , अंत असेल की नाही माहीत नाही... अशा अज्ञाताशी तिची आणि तमाम वैद्यकीय शास्त्राची लढत होती. ४ दिवसाच्या अथक अभ्यासांतीही जेव्हा काहीच निष्पन्न होईना तेव्हा एक शेवटचा उपाय म्हणून डॉक्टरांनी संपूर्ण रक्त बदलण्याचा निर्णय घेतला... "डायलिसिस्" ची तयारी झाली... इकडे "मिडिया" नावाच्या त्या सुकुमार दिसणाऱ्या मायावीनी ने तिच्यासाठी शुभेच्छांचे  SMS  मग ती जगेल की नाही यावरची Votes  यावर आपली क्षुधा शमवायला सुरुवात केलीच होती.
टप्प्याटप्प्यानं सगळं रक्त बदललं गेलं, थेंबन थेंब नवीन असलेलं तरीही थकून गेलेलं ते शरीर परत एकदा रक्ततपासणीसाठी सिद्ध झालं. दोनच दिवसात परत एकदा आणखी एक कागदाचा तुकडा जगासमोर आला आणि "ब्रेकिंग न्यूज" आता "निराशाजनक बातमी" म्हणून झळकली. डबल फिल्टर्ड, ट्रिपल फिल्टर्ड वगैरे तेल आणावं आणि तरी किटली उघडल्यावर कुजकाच वास यावा तसा तो घटक अख्खं रक्त बदललं तरी तिथेच ठाण मांडून बसून राहिला होता...
दिवसागणिक एकिकडे मनातला थकवा आणि निराशा वाढत होती तर दुसरीकडे  मसालेदार बातम्यांचं भरीत प्रेक्षकांच्या, वाचकांच्या नि श्रोत्यांच्या सेवेसाठी तयार होत होतं.आणखी एक प्रयत्न म्हणून परत एकदा रक्त बदलावं की काय असा विचार चालू असतानाच, तिच्या नावे एक निनावी पत्र आलं. पत्र तसं खाजगी खरं पण तिच्या अस्तित्वावर रंगलेल्या चर्चेइतकंच सार्वजनिक ते क्षणाचीही उसंत न घेता झालं.पत्र अगदी नेमकं .....

"बाळ, तुला जे झालंय त्याचा उपाय कोणत्याच वैद्याकडे तुला मिळायचा नाही. जो घटक आज तुझ्या रक्तात दिसतोय तो माझ्या रक्तात दिसला त्याला काही वर्षं लोटली. हा घटक मानवी रक्तात असतोच, फक्त मजा अशी आहे की वटवाघळांचा आवाज जसा कानाच्या पडद्यावर आपटूनही आपण ऐकू शकत नाही तसंच या घटकाचं अस्तित्वं...इतकं दीर्घ की आपल्याला सहसा ते जाणवत नाही...  एक विषाणू आहे तो जर चुकून शरीरात भिनला तर मात्र हे दीर्घ असणं विरायला लागतं ...आणि मग तो रक्तात असा दिसून यायला लागतो. हा विषाणू भारतीय उपखंडात पाचएकशे वर्षापूर्वी खूप होता...आता सापडत नाही फारसा; पण तू आणि मी त्याला आकर्षित करणारे लाखांतले एखादे... या विषाणूचं नाव प्रत्येकासाठी वेगळं ... मुक्ताईला भिडला विट्टल म्हणून आणि मीरेला ग्रासलं कृष्ण होऊन... मला ज्या नावानं ग्रासलं ते सांगितलं तर तुझ्याभोवती फिरणारे सगळे "कॅमेरे" माझ्याभोवती घिरट्या घालतील , फ़क्त म्हणून त्याचा उल्लेख टाळतो.. तर असा हा विषाणू... आणि जो घटक तुला दिसतोय, त्याचं नाव "अहं" किंवा "मी" पणा....तुझ्यातला "मी" ह्रस्व झालाय पोरी... तुझ्यातला "मी" आता "मि" झालाय.... याला संपवण्याचा उपाय एकच, तुला ग्रासलेल्या विषाणूचं नाव लवकरात लवकर शोध. एकदा का त्याला शोधलं आणि त्याला बिनशर्त शरण गेलं की हा उरलासुरला "मि" त्यात विरघळून जाईल... तुला परत तुझं शरीर होतं तसं मिळेल... किंबहुना याही पेक्षा कित्येक पटीनं उत्कृष्ट.... तुही, तुझं अस्तित्वंही.... तेवढं नाव मात्र लवकर दे त्या तुझ्या विषाणूला... नाहीतर नाहक मरशील... शुभम!!!"

कालच हे पत्र सगळ्या जगाला ऐकायला मिळालं... कुणाच्या तरी वेदनेवर उपाय मिळण्याची शक्यता निर्माण झाली म्हणल्यावर त्यात काही मसालेदार उरलं नाही... तिचा शोध पूर्ण होईल किंवा नाही.. ती बरी होईल किंवा होणार नाही...द्यायची आहे कुणाला तिची साथ... तर आता चघळून बेचव झालेलं हे च्युविंगम... तसंही इतके दिवसात राजकारण, बलात्कार,खून, भ्रष्टाचार, त्यावरचे कायदे, पेज ३ वरची गोसिप्स या सगळ्या सगळ्यांमधल्या कित्ती तरी गोष्टी आसुसल्या आहेतच "ब्रेकिंग न्यूज" चं बिरूद मिरवायला... तिचं काय होईल....ते काही का होईना...पण महिना १५ दिवस श्टोरी मात्र बेस मिळाली हे तेवढं खरं...नव्यानं उंचावल्या जाण्यासाठी...इतके दिवस ताणल्या गेलेल्या भुवयांना जरा आराम मिळाला.....बरेच दिवस गाजत असलेल्या "ब्रेकिंग न्यूज"वर शेवटी आज पडदा पडला...

image courtesy : Internet